Thursday, 28 January 2016

संध्याकाळ

आज पुन्हा ती संध्याकाळ  मला भेटायला आली …
म्हणाली  आज परत माझी   आठवण काढलीस ?
मी फक्त तिच्याकडे पाहून हसले ,
अन तिला माझ्या  डोळ्यात  सर्व काही दिसले .
फक्त डोक्यावर हात फिरवत म्हणाली,
ठेव थोडी हिम्मत ,चालत राहा फक्त…
जे येईल  मनात ते करत जा व्यक्त .
मी येईल परत कधी तरी आशीच…
जेव्हा  असशील  तू अशीच अशांत.
आज पुन्हा ती संध्याकाळ  मला भेटायला आली …