तो नुकताच ऑफिस मध्ये पोहचला होता आणि त्याचा मोबाईल वाजला.मेसेज होता.... तिचा होता....
"मी जात आहे मुंबई सोडून......कायमची...खूप खूप लांब.
कधी,कोठे या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकत नाही आणि का जात आहे याचे उत्तर कदाचित तुला माहित आहे.
तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
Good bye ."
तो दोन मिनिट शांत बसला आणि लगेच निघाला...गाडीपाशी गेला तर चावी वरच राहिली होती. त्याने लगेच टॅक्सी पकडली... तिला फोन लावला,फोन स्वीच ऑफ होता. काहीच सुचत नव्हते त्याला कोठे जावे...त्यांने टॅक्सी तिच्या घराकडे घ्यायला सांगितली...
टॅक्सी मध्ये रेडिओ चालू होता...चार ओळी त्याच्या कानावर पडल्या.
"करते है हम आज कबुल क्या किजीए,
हो गई थी जो हमसे भूल क्या किजीए,
दिल कह राहा है उसे मय्यासर कर भी आओ,
वो जो दबी सी आस बाकी है....
वो जो अधुरी सी बात बाकी है।
तिचा चेहरा त्याला दिसत होता...सगळ्या आठवणी अशा समोर आल्या..
त्याच्या डोळ्यांच्या कडांमध्ये पाणी भरले होते...
त्याने डोळे गच्च मिटून घेतले.
तिचे सगळ्यात आवडते गाणे होते ते...
खूप भावूक झाला होता तो...त्याला कळत नव्हते नक्की का जात होता तो.
तिच्या घराच्या खाली पोहचला तो..वॉचमन ने सांगितले की ती नाहीये घरात...बॅग्स घेऊन दहा मिनिट पूर्वीच विमानतळाला जायला निघाली..
टॅक्सी विमानतळाकडे वळवली.
ती पोहचली होती...ती आत जाणार तोपर्यँत "सृष्टी" अशी हाक आली.तिची पावले थांबली ...तो कार्तिकचा आवाज होता हे कळाले होते तिला.तिने हेडफोन काढले...
अन मागे पहिले तर तोच उभा होता...खूप दमल्यासारखा दिसत होता.
त्याने तिला विचारले का जात आहेस?
ती फक्त हसली आणि म्हणाली मी का जात आहे हे महत्वाचे नाही...मला फक्त एका प्रश्नाचे उत्तर दे की "तू इथे मला थांबवायला आला आहेस कि शेवटचे भेटायला"?
तो शांत झाला ,त्याला माहीत होते आणि तिला ही ...त्याला तिला थांबता येणार नव्हते.त्याच्या मध्ये तेव्हा ही एवढी हिम्मत नव्हती आणि अत्ता ही. तो फक्त तिला शेवटचे बघायला आला होता.
तिने हेडफोन पुन्हा कानात घातले...
"फासलें ऐसें भी होंगे ये कभी सोचा न था...
सामने बैठा था वो मेरे...पर कभी मेरा न था...."
आणि ती निघाली...
तो तिच्या कडे पाहत राहिला....तिने मागे वळून नाही पाहिले...
ती गेली होती कायमची.
-रश्मी