Friday, 12 February 2016

निरोप "माझ्यातला तूला"

निघावं म्हणते येथून...खूप अंधार झाला आहे...
हो आपल्या नात्यामध्ये खूप अंधार झाला आहे.
माझे भविष्य तर नाहीच पण माझा वर्तमान ही मला पुसटसा सुद्धा दिसत नाहीये या नात्यात.माझी स्वप्न सत्याच्या उजेडाने झाकून जात आहेत....आणि आता हे सत्य स्वीकारण्या खेरीज इतर कोणताही पर्याय मला दिसत नाही.
 मी थांबले होते,खूप वेळ ही घेतला ...पण आता वेळ निसटून जायच्या आत मला सावरलं पाहिजे,माझ्या पंखांना पुन्हा बळ दिले पाहिजे.मला उडायचे आहे ,तुझ्या बरोबर किव्हा तुझ्या शिवाय.मुक्त व्हायचे आहे आणि मुक्त भरारी ही घ्यायची आहे.कोणीतरी परतले ही वाट मी आता नाही बघू शकत...ती आस ही मी सोडली आहे  आणि इच्छा ही. 
माझ्या स्वप्नाचे तुकडे ही मी वेचनार नाही ,कारण आता नकोत मला ती अर्धवट स्वप्ने. नवीन स्वप्ने बघायला स्वतःला तयार करत आहे मी,आणि पाहीन ही .स्वतःसाठी...स्वतःच्या आनंदासाठी...आणि तोच आता जास्त महत्वाचा आहे.  शेवटी प्रत्येक जण आपला मार्ग निवडतो,आणि मीहि तेच करणार आहे. 

....आता मला निरोप घ्यायचा आहे... तुझा नाही "माझ्यातल्या तुझा".
                                                     -रश्मी

8 comments:

  1. अप्रतिम..
    हे मी share करू का plzz?? अर्थात तुझ्या नावासाहित..

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लिहिल आहे.मनाला भावुन जाणारी ओळ म्हणजे...

    माझ्या स्वप्नाचे तुकडे ही मी वेचनार नाही ,कारण आता नकोत मला ती अर्धवट स्वप्ने. नवीन स्वप्ने बघायला स्वतःला तयार करत आहे मी,आणि पाहीन ही .स्वतःसाठी...स्वतःच्या आनंदासाठी...आणि तोच आता जास्त महत्वाचा आहे.

    ReplyDelete