खूप उशीर झाला होता आज घरी जायला...दहा वाजत आले होते.मी गेले आणि बस स्टॉप वरच्या बाकावर बसले....शेजारी तरुण मुलगा बसला होता ...मी विचारले त्याला स्वारगेट ची बस गेली का?"नाही" ...एवढेच म्हणाला.Struggler होता बहूतेक. हातात एक file होती आणि त्यावर एका कागदावर काहीतरी रेखाटत होता.
सगळीकडे शांतता होती फक्त .....तो चित्र रेखाटत होता आणि मी आपला मोईबल बघत बसले.तरीही मनात हाच विचार येत होता की कोण असावा हा,काही दुःख असेल का याला?
इतक्यात एक गाडी समोरून येताना दिसली...तिने थांबवली ती गाडी बस स्टॉप पाशी.एक साधी पण सुदंर साडी घातली होती तिने.तिच्या गळ्यातले ते मंगळसूत्र माझ्या नजरेतून नाही चुकले.नुकतेच लग्न झाले असावे तिचे....पण चेहऱ्याचे तेज डोळ्यात नव्हते दिसत तिच्या.
गाडी थांबलेली पाहून तो मुलगा उठला आणि तिच्या समोर जाऊन थांबला.त्यांची नजरा-नजर झाली.असे वाटत होते सगळे डोळ्यांनीच बोलत आहेत दोघे.
दोन मिनिटं झाल्या नंतर फक्त दोनच शब्द बोलली ती "Happy Birthday"... इतकेच बोलून ती निघाली...तिची गाडी दिसेनाशी होई पर्येंत तो रस्त्याकडे बघत राहिला एकटक.
आता परत तो बाकावर येऊन बसला.आता त्याने हातात परत ती file नाही घेतली,फक्त एकटक रस्त्याकडे बघत बसला.डोळ्यात अश्रू भरलेले होते.
मला काहीच कळाले नाही.खूप प्रश्न पडले.. कोण होती ती?,एवढ्या उशिरा इतकेच बोलायला का आली असेन? असे आणि अजून काही.
आणि मग एक बस अली ,तो उठला आणि file घेतली आणि त्या बस मध्ये चढला. पण ते पान निखळून खाली पडले,त्याला हाक देणार तो पर्यंत बस गेली होती.मी पाहिले तर त्या कागदावर एक चित्र होते ,हो तिचेच होते ते....अगदी जशी आली होती तशीच....फक्त एक फरक होता, चित्रात मंगळसूत्र नव्हते तिच्या गळ्यात.मी एकदम शांत झाले ...माझ्याच डोळ्यात अश्रू आले आणि एक थेंब त्या चित्रातवर पडला आणि त्यामध्येच झिरपवून गेला.
प्रेम तिचे होते आणि त्याचे ही.... दुःख त्याला होते आणि तिला ही....
हा चित्रकार मला नकळत काही शिकवून गेला...जणू ते चित्र माझ्या साठीच ठेवून गेला.
(c)Rashmi Deshpande.
-रश्मी

वाह! अप्रतिम.
ReplyDeleteवाह..
ReplyDelete